मुंबई : जीएसटी दर कपातीमुळे अनेक आर्थिक बाबींवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले. महानगरे आणि उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये या सणासुदीच्या काळात मागणीत २३-२५% वाढ झाली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मोठ्या स्क्रीन टीव्ही, मिड-रेंज फॅशन आणि फर्निचरसह ज्यादा मागणी असलेल्या श्रेणींवर कर कमी करण्यात आले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना थेट फायदा झाला आहे.
जीएसटी बदलांमुळे किरकोळ किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे खरेदीत चांगली बाब दिसून आली. यामुळे टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये सहभाग वाढला आहे. मोठ्या टीव्हीवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी केल्याने किरकोळ किमतीत ६-८% घट झाली आहे, ज्यामुळे प्रीमियम मॉडेल्सची मागणी वाढली आहे. २५०० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या फॅशन वस्तूंवरील ५% जीएसटीमुळे मध्यम बाजारपेठेतील कपड्यांच्या खरेदीला चालना मिळत आहे.
तसेच नवरात्रीच्या पहिल्या दोन दिवसांत विक्रीत २३-२५% वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत हे चार ते पाच पट जास्त आहे. मागणी इतकी जास्त होती की, काही अॅप्स ऑर्डर दिल्यानंतर काही मिनिटांतच क्रॅश व्हायच्या. मागणीचा कल वाढता असल्याचे नोंदवले गेले आहे.
मूल्यांकित बाँड येण्याची शक्यता
ब्रिक्स देशांनी समर्थित न्यू डेव्हलपमेंट बँक (एनडीबी) मार्च अखेरीस देशांतर्गत बाजारात त्यांचा पहिले भारतीय रुपया-मूल्यांकित बाँड जारी करण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी आरबीआयशी चर्चा सुरू आहे. एनडीबीने यापूर्वी चिनी युआन आणि दक्षिण आफ्रिकन रँडमध्ये निधी उभारला आहे.


