Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar on Laxman Hake : अजित पवारांनी लक्ष्मण हाकेंचा खरपूस समाचार; म्हणाले, तसलं आमच्या मनात…

Ajit Pawar on Laxman Hake : अजित पवारांनी लक्ष्मण हाकेंचा खरपूस समाचार; म्हणाले, तसलं आमच्या मनात…

बारामती : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामती बँकेवर आणि पवार कुटुंबावर गंभीर आरोप करताना मराठा समाजाला अण्णासाहेब महामंडळातून मोठ्या प्रमाणात कर्ज मंजूर होत असल्याचा दावा केला होता. या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रत्युत्तर दिले.

“कोणतरी येऊन बँकेच्या संदर्भात बोलतो, पण त्यांना माहिती अर्धवट असते. मी कधी जाती-जातीचा विचार केला नाही. काहींनी भासवलं की, इथे ठराविक लोकांना कर्ज दिलं जातं. तसं आमच्या मनात पण येत नाही. आम्ही सगळ्यांसाठी काम करतो. तुम्ही येता आणि भाषणं करता, पण माध्यमांनी खाली टीप टाकावी लागेल,” असा खरपूस समाचार अजितदादांनी हाकेंचा घेतला. ही घटना बारामतीतील ओबीसी मोर्च्यातील वादानंतर घडली, ज्यात हाके यांच्यावर विनापरवानगी मोर्चा काढल्याबद्दल गुन्हे दाखल झाले होते.

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतेची घोषणा, ५ ट्रक साहित्य पाठवणार

अजित पवार यांनी सभेत अतिवृष्टीबाबत बोलताना राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. “राज्यात अतिवृष्टी झाली आहे. अजून चार दिवस रेड अलर्ट राहण्याची शक्यता आहे. नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. निर्गाची अवकृपा झाल्यावर काय होऊ शकते, हे आपण पाहिले आहे. १ हजार साड्या, परके अशी ५ ट्रक मदत पाठवायची आहे. मला एकाने सांगितलं, त्यानुसार आम्ही नियोजन करतो आहोत,” असं ते म्हणाले. यामुळे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी बारामतीकडून होणाऱ्या मदतीची घोषणा झाली, जी अजित पवारांच्या विकासकेंद्रित धोरणाचा भाग आहे.

‘मी कामाचा माणूस’, २५ कोटी मंजूर, उर्दू शाळेला ४.५ कोटी

अजित पवार यांनी स्वतःच्या कामाच्या जोरदार शैलीचा बडेजाव दिला. “बारामतीसाठी आज मी दोन कोटी रुपये मंजूर केले. बारामती शाळेसाठी काही पैसे उपलब्ध केले. गरिबांची पोरं शिकली पाहिजेत. उर्दू शाळेला साडेचार कोटी मंजूर केले. सकाळी ६ वाजता उठून काम करतो. काल आणि परवा दुपारी जेवलो नाही. काल कारखान्यावर कोण काहीतरी आणून द्यायचं, आणि मी खायचो. आज सकाळी वेगवेगळ्या कामांसाठी २५ कोटी मंजूर केले. कामाच्या बाबतीत आपला हात कुणीच धरू शकत नाही. मी कामाचा माणूस आहे,” असं ते म्हणाले. यातून त्यांच्या अथक प्रयत्नांचा उल्लेख करत, त्यांनी स्थानिक विकासावर भर दिला.

एमआयडीसी स्टेडियमला ७८ कोटी मंजूर

बारामतीच्या भविष्यकालीन विकासाकडे लक्ष केंद्रित करत अजित पवार म्हणाले, “बारामतीतील एमआयडीसी परिसरात ७८ कोटीच्या स्टेडियमला मंजुरी दिली आहे. बारामतीत मला इंदूरच्या धर्तीवर जायचं आहे. चाकण, बारामती आणि लोणावळा ही तीन शहरे निवडली आहेत.” त्यांनी माजी आमदार नितीन करीर यांच्याबद्दल बोलताना सांगितलं, “नितीन करीर रिटायर झाले. त्यांनी सांगितले की मी लोणावळावर लक्ष देईन. ६० व्या वर्षी रिटायर व्हा, पण काम करायला मदत करा ना. कुणी अंडी विकायला बसत आहे, हे असलं मला चालणार नाही. ज्यांना विकायचं आहे त्यांनी गाळे घ्या.” असंही अजित पवार म्हणाले.

मातोश्रींच्या प्रेरणेबद्दल बोलताना ते भावुक झाले. “मला आईला बघितली की स्फूर्ती येते. जास्त काम करावंसं वाटतं. रात्री आईला भेटून येतो. तेव्हा लाईट बंद असते, लगेच चालू करतो.” पावसाबाबत बोलताना त्यांनी खोडून काढलं, “जरा पाऊस पडला की लगेच दाखवतात बघा बारामती पाण्यात. काहीजण महिला भगिनींना सांगतात. पाण्यातून गाडी घालून मी शूटिंग काढतो. अगं थोडं पलीकडून जाणार मी. तुला लाडकी-लाडकी लाडकी म्हणून तू दोडकीसारखी वागायला लागली.”

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!