Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune: ‘तुझे हातपाय तोडल्याशिवाय तू शांत बसणार नाही’, शरद पवारांच्या प्रवक्त्याला जीवे मारण्याची धमकी

Pune: ‘तुझे हातपाय तोडल्याशिवाय तू शांत बसणार नाही’, शरद पवारांच्या प्रवक्त्याला जीवे मारण्याची धमकी

Pune News:  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं यांनी म्हटले आहे. त्याबाबतची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहेत. याबाबतची पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि प्रवक्ते विकास लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. त्यानंतर लवांडे यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या गैर कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे आणि शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी देखील याबाबत अनेक वेळा भ्रष्टाचाराचा चौकशी बाबत मागणी केली आहे.

भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरल्याने लवांडे यांना धमक्या येत असल्याचं रोहित पवार यांनी देखील सांगितले आहे. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्याकडून सातत्याने पुणे बाजार समितीत होत असलेला भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या लुटीवर आवाज उठवला जातोय. यामुळे काही गुंडांकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

त्यांच्या केसालाही धक्का लागला तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारवर राहील. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांनाही निवेदन दिलं असून त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई करावी आणि विकास लवांडे यांना संरक्षण द्यावं, अशी आमची मागणी आहे. असे रोहित पवार म्हणाले.

दरम्यान लवांडे यांनी पोलीस आयुक्तांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळातील काही व्यक्ती आपल्याला धमकावत असल्यास सांगितला आहे. तुझे हातपाय तोडल्याशिवाय तू शांत बसणार नाही. 24 तास तुझ्या कुणी राखणीला नाही. आम्ही शांत बसणार नाही तुझी आमच्याशी गाठ आहे. तुला संपवल्याशिवाय राहणार नाही. नेते घरी राहतील तू देवा घरी जाशील. अशा धमक्या आपल्याला दिल्या जात असल्याचं लवांडे यांनी म्हटले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!