मुंबई : सध्या अनेक चित्रपट रिलीज होत आहेत. त्यात आता हा एक नवीन आठवडा आहे आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन चित्रपट आणि वेब सीरीज रिलीजसाठी सज्ज आहेत. हिंदी चित्रपट किंवा सीरीज रिलीज झाल्या नसल्या तरी तुम्ही भरपूर इंग्रजी चित्रपट आणि के-पॉप ड्रामा पाहू शकता.
प्राईम व्हिडिओवर रिलीज झालेला ‘मद्रासी’ हा चित्रपट दोन लोकांची स्टोरी सांगतो. रघू आणि प्रेमनाथ असे हे दोन पात्र आहेत. रघू ब्रेकअपच्या वेदनेशी झुंजत आहे तर प्रेमनाथ एका शक्तिशाली टोळीशी उभा आहे. सोनी लिव्हवर रिलीज झालेला ‘१३ वा’ हा चित्रपट नीट-जेईई शिक्षक मोहित त्यागी यांच्या जीवनावर आधारित आहे. परेश पाहुजा मुख्य भूमिकेत आहेत. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला ‘द गेम : यू नेव्हर प्ले अलोन’ ही वेब सीरीज ही एक मानसशास्त्रीय थ्रिलर सीरीज आहे, ज्यामध्ये श्रद्धा श्रीनाथ गेम डेव्हलपरची भूमिका साकारत आहे.
सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा ‘धडक २’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आला आहे. हा चित्रपट जातीभेद आणि प्रेमकथेवर आधारित आहे. ‘सन ऑफ सरदार २’ नेटफ्लिक्सवर आला आहे. चित्रपटगृहांमध्ये तो चांगला चालला नाही. ओटीटीवर तो कसा चालतो हे पाहणे बाकी आहे. या चित्रपटात अजय देवगण, मृणाल ठाकूर, रवी किशन आणि नीरू बाजवा यांच्या भूमिका आहेत.


