Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पदवीधर निवडणुकीत उमेदवारीची आस; आमदार अरुण लाड यांच्या पुत्राचा उद्या भाजप प्रवेश

पदवीधर निवडणुकीत उमेदवारीची आस; आमदार अरुण लाड यांच्या पुत्राचा उद्या भाजप प्रवेश

सांगली: पुढील वर्षी होणाऱ्या पुणे पदवीधर मतदार संघाची उमेदवारी नजरेसमोर ठेवून आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड हे मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद लाड हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा प्रदेश उपाध्यक्ष आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. लाड यांच्या प्रवेशाने पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्या खेपेस अरुण लाड निवडून आले होते. आता भविष्यातील राजकीय महत्वकांक्षा म्हणूनच त्यांच्या पुत्राचा भाजपमध्ये प्रवेश होत असल्याचे मानले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला धक्का तर बसलाच आहे. याचबरोबर पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या मतपेढीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात राहून राजकीय भवितव्य उज्वल होईलच, याची खात्री नसल्याने लाड भाजप प्रवेशासाठी राजी झाले आहेत, असे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीत फारसे भवितव्य नसल्याने आमदार अरूण लाड यांनी पदवीधर मतदार संघासाठी दहा वर्षापूर्वी बांधणी केली होती. त्यावेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने त्यांच्याऐवजी सारंग पाटील यांना उमेदवारी दिली. लाड यांच्या बंडखोरीमुळे आघाडीचा उमेदवार पराभूत झाला. या पराभवाने खचून न जाता आमदार लाड यांनी मागील निवडणूक भाजपचे संग्राम देशमुख यांच्याविरूध्द लढवली. त्यावेळी मतदार नोंदणीपासून निवडणुकीची यंत्रणा शरद लाड यांनीच हाताळली.

सोलापूर जिल्ह्यातून शरद लाड यांचे सासरे बबन शिंदे, संजय शिंदे यांची मदतही मोलाची ठरली. पूर्वनियोजन व्यवस्थित केल्याने ४८ हजार ८२४ मतांनी अरुण लाड आमदार झाले. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. पुणे पदवीधर मतदार संघ पुण्यासह सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा वा चार जिल्ह्यातील ५४ विधानसभा मतदार संघ आहेत. यापैकी सुमारे ४० विधानसभा मतदार संघात महायुतीचे आमदार आहेत. निवडणुकीत चार ते साडेचार लाख मतदार नोंदणी अपेक्षित असून हा सर्व मतदार सुशिक्षित असल्याने प्रचाराची पध्दतही वेगळीच राहते. भाजपचा हा पारंपारिक मतदार संघ आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!