Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

जयपूरच्या सवाई मान सिंग रुग्णालयाच्या ICU ला भीषण आग, 7 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूरच्या सवाई मान सिंग रुग्णालयाच्या ICU ला भीषण आग, 7 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मान सिंग (SMS) रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरच्या अतिदक्षता विभागात (ICU) भीषण आग लागल्याने किमान सात रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना पहाटे 1:30 वाजता ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू वॉर्डच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्टोअर रूममध्ये घडली. प्राथमिक माहितीनुसार, आग शॉर्ट सर्किटमुळे लागली, ज्यामुळे स्टोअर रूममध्ये साठवलेले साहित्य, कागदी फायली आणि वैद्यकीय उपकरणे जळून खाक झाली.

हेही वाचा – Mumbai Fire: गोरेगाव पश्चिम येथील सिटी सेंटर मॉलजवळील शालीमार मिरॅकल इमारतीला भीषण आग, पहा व्हिडिओ

या दुर्घटनेबद्दल माहिती देताना ट्रॉमा सेंटरचे प्रभारी अनुराग धाकड यांनी सांगितले की, ट्रॉमा आयसीयूमध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि आग वेगाने पसरली. त्यानंतर विषारी वायू बाहेर पडले. यामुळे बहुतेक गंभीर रुग्ण बेशुद्ध पडले. सहा रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर होती, त्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न झाले, पण त्यात यश आले नाही. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. नर्सिंग अधिकारी आणि वॉर्ड बॉईजच्या पथकाने तातडीने 24 रुग्णांना आयसीयूमधून ट्रॉलीवर दुसऱ्या ठिकाणी हलवले. वाचवलेल्या रुग्णांपैकी अजूनही पाच रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

मुख्यमंत्री भजनलाल शर्मांकडून रुग्णालयाला भेट

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी तातडीने एसएमएस रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्ण आणि डॉक्टरांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेवर बैठक घेऊन उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी सांगितले की, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) टीम चौकशी करत आहे. प्राथमिक दृष्ट्या शॉर्ट सर्किट हे कारण दिसत असले तरी, एफएसएलच्या तपासानंतर अंतिम निष्कर्ष काढला जाईल. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात हलवण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!