Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nilesh Ghaywal : निलेश घायवळच्या घरावर पोलिसांचा छापा; जिवंत काडतुसे, ४० कागदपत्रे अन् बरंच काही…

Nilesh Ghaywal : निलेश घायवळच्या घरावर पोलिसांचा छापा; जिवंत काडतुसे, ४० कागदपत्रे अन् बरंच काही…

पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर मकोका अंतर्गत कारवाई होताच परदेशात फरार झालेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या दोन दिवसांत घायवळच्या पुण्यातील कोथरूड परिसरातील दोन घरांवर झाडाझडती घेतली असता, पोलिसांच्या हाती जिवंत काडतुसे, रिकामे पुंगळे, ४० हून अधिक महत्वाची कागदपत्रे, सातबारा कोरा, साठेखत आणि मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पाशी संबंधित फाइल्स सापडल्या.

या जप्त वस्तू गुन्हेगारीला आळा घालण्याच्या मोहिमेचा भाग असून, घायवळच्या बेकायदा मालमत्तांवर पुणे महानगरपालिकेने (PMC) सील आणि जप्तीची कारवाई सुरू केली आहे. तसेच, बनावट कागदपत्रांद्वारे मिळवलेल्या पासपोर्टची रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असून, बँक खाती गोठवण्याचे आदेश दिले आहेत.

काय सापडले घरात?

बंदुकीच्या जिवंत काडतुसे आणि रिकामे पुंगळे. शस्त्र परवाना नसतानाही हे सापडल्याने घायवळ टोळीचा पुण्यात मोठा कट किंवा रक्तपाताचा प्लॅन असल्याचा संशय निर्माण झाला आहे. ४० हून अधिक कागदपत्रे, ज्यात सातबारा कोरा, साठेखत आणि मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पांच्या फाइल्सचा समावेश. यामुळे घायवळच्या बेकायदा संपत्तीचा खुलासा झाला. याआधी २६ सप्टेंबरला कोथरूड घरावर झाडाझडतीत दोन स्कॉर्पिओ कार आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या.

या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या असून, कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासात असे धक्कादायक उघडकीस आले की, घायवळने गुन्हेगारी पैशातून कोट्यवधी रुपयांची माया जमवली असून, त्यातून लंडनमध्ये घर घेतले आहे. त्याचा मुलगा तेथे उच्च शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.

घायवळच्या नावावर अनेक बेकायदा मालमत्ता असल्याचे तपासात समोर आले असून, पोलिसांनी पुणे महानगरपालिकेला (PMC) अधिकृत पत्र पाठवले आहे. पत्रानुसार, थकीत कर असलेल्या आणि बेकायदा बांधकाम असलेल्या संपत्तींवर सील आणि जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. मनपेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लवकरच घायवळच्या प्रॉपर्टीवर मोठी कारवाई होईल, ज्यामुळे त्याच्या गुन्हेगारी साम्राज्याला धक्का बसणार आहे.

निलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी ‘गायवळ’ असे खोटे नाव आणि बनावट कागदपत्रे वापरली होती. त्याने अर्जात आपल्यावर कोणताही गुन्हा नसल्याचे खोटे सांगितले. पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पासपोर्ट रद्द करण्यासाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाशी चर्चा केली असून, प्रक्रिया सुरू आहे. तसेच, लूकआऊट नोटीस जारी करून घायवळला परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय यंत्रणांचा सहभाग घेतला जात आहे. त्याच्या बँक खात्यांवर गोठा घालण्याचे आदेश दिले गेले असून, तो सध्या पत्नी आणि मुलासह लंडनमध्ये लपलेला असल्याची माहिती आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!