Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Walmik Karad : थोडीशी मदत अण्णासाठी…! वाल्मिक कराडच्या नावाने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; मुंडे बंधू भगिनींचेही फोटो झळकले

Walmik Karad : थोडीशी मदत अण्णासाठी…! वाल्मिक कराडच्या नावाने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; मुंडे बंधू भगिनींचेही फोटो झळकले

बीड : संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या नावाने सोशल मीडियावर आर्थिक निधी गोळा करण्याचे बॅनर व्हायरल होत असल्याने बीड जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. या बॅनरमध्ये भाजप नेते पंकजा मुंडे आणि प्रताप मुंडे यांच्या भगिनींचे फोटो झळकले असून, “थोडीशी मदत अण्णासाठी” असा भावनिक मजकूर आणि फोनपे QR कोड देण्यात आला आहे.

हा QR कोड संदीप गोरख तांदळे यांच्या बँक खात्याशी जोडलेला असल्याचे उघड झाले आहे. या वादग्रस्त मोहिमेमुळे भगवान भक्ती गड ट्रस्टने तक्रार दाखल केली असून, अंमळनेर पोलिस तपास सुरू करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या बॅनरमध्ये “वाल्मिक (अण्णा) कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी, तसेच सोशल मीडियावर अण्णांचे नाव आणि चेहरा कायम दिसत राहावा, यासाठी आपले आर्थिक सहाय्य अत्यावश्यक आहे” असा मजकूर आहे. “फुल ना फुलाची पाकळी… थोडीशी मदत अण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी” अशा भावनिक ओळींनी निधी मागितला जात असून, बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो आणि मुंडे भगिनींचे फोटोही समाविष्ट आहेत.

हा बॅनर व्हॉट्सअॅप ग्रुप्स, फेसबुक आणि इतर प्लॅटफॉर्मवर पसरत असून, त्यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. समर्थकांकडून “अण्णा आपल्यात येतील तरच” असा दावा केला जात असल्याचे समोर आले आहे. या बॅनरमधील QR कोड संदीप गोरख तांदळे यांच्या बँक खात्याशी जोडलेला असून, तांदळे हा व्यक्ती यापूर्वी अनेक वादात सापडला आहे.

आमदार सुरेश धस, जितेंद्र आव्हाड आणि विजयसिंह बांगर यांना व्हिडिओद्वारे धमक्या देण्याचा प्रकार त्याने केला होता. विशेष म्हणजे, सावरगाव येथील भगवान भक्ती गडावरील पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात तांदळेने वाल्मिक कराडचा फोटो झळकावत निधी संकलन केल्याचा प्रकार घडला होता, ज्यामुळे हा बॅनर पुन्हा चर्चेत आला आहे. तांदळेच्या या कारवायांमुळे राजकीय नेत्यांमध्ये नाराजी आहे.

या बॅनरमुळे भगवान भक्ती गड ट्रस्टने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हे बॅनर कोणी तयार केले, याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!