Nagarpalika and Nagarparishad Reservation: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्य सरकारने 247 नगरपरिषद आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाची घोषणा केली. मंत्रालयात मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सोडतीत विविध प्रवर्गांनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने प्रशासनाने वेगाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार आता आरक्षण निश्चित झाल्याने निवडणुकीची दिशा स्पष्ट होऊ लागली आहे.
अनुसूचित जाती (SC) महिला प्रवर्गात 16 नगरपरिषदांचा समावेश
घोषणेनुसार 33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदांसाठी अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण देण्यात आले आहे. या यादीत मोहोळ, ओझर, भुसावळ, शिर्डी, दिग्रस, अकलूज, बीड, देऊळगावराजा, तेल्हारा, वानाडोंगरी, घुग्गूस, चिमूर, सावदा, मैनदर्गी, दिगडोहदेवी आणि शिरोळ नगरपरिषदांचा समावेश आहे.
अनुसूचित जमाती (ST) महिला आरक्षण घोषित
अनुसूचित जमाती प्रवर्गात भडगाव (जळगाव), वणी, पिंपळनेर (धुळे), उमरी (नांदेड), यवतमाळ आणि शेंदूरजनघाट या नगरपरिषदांसाठी महिला आरक्षण जाहीर झाले आहे.
हेही वाचा – Bihar Election 2025: बिहार निवडणुकीचे बिगुल आज दुपारी 4 वाजता वाजणार
34 नगरपरिषद OBC महिलांसाठी राखीव
याशिवाय, 67 नगरपरिषदांपैकी 34 नगरपरिषद OBC महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यात भगूर, इगतपुरी, विटा, बल्हारपूर, धाराशिव, भोकरदन, जुन्नर, उमरेड, दौंड, बदलापूर, हिंगोली, फुलगाव, मुरुड-जंजीरा, शिरूर, काटोल, माजलगाव, मूल, मालवण, देसाईगंज, हिवरखेड, अकोट, मोर्शी, नेर-नवापूर, औसा, कर्जत, देगलूर, चोपडा, सटाणा, दोंडाईचा-वरवडे, बाळापूर, रोहा, कुरडुवाडी, धामणगाव रेल्वे आणि वरोरा यांचा समावेश आहे.
हेही वाचा – BMC Election: राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांच्या रचनेला मंजुरी
आरक्षण जाहीर झाल्याने आता स्थानिक पातळीवरील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापी, आरक्षण जाहीर झाल्याने अनेक शहरांतील लोकप्रतिनिधी आणि इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


