Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी! पूरग्रस्तांसाठी सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर; शेतकऱ्यांना काय-काय मिळणार?

मोठी बातमी! पूरग्रस्तांसाठी सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर; शेतकऱ्यांना काय-काय मिळणार?

मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा करण्यात आली. यामुळे दिवाळीपूर्वीच बळीराजाच्या खात्यावर मदतनिधी जमा होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेली आहे, त्यांना प्रति हेक्टरी 3.47 लाख रुपये मदत मिळेल. तसेच, नुकसानग्रस्त पिके, जनावरे आणि घरांसाठीही स्वतंत्र आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. हे आतापर्यंतचे राज्यातील सर्वात मोठे शेतकरी मदत पॅकेज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले

हेही वाचा – पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या भाजप खासदार, आमदारावर हल्ला; दगडफेकीत गाड्या फोडल्या

शेतकऱ्यांना काय मदत मिळणार?

  • जमीन वाहून गेलेल्यांना हेक्टरी 3.47 लाख मदत
  • रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी 10,000 अनुदान
  • हंगामी बागायती शेती नुकसान भरपाई – 27,000 प्रति हेक्टरी
  • बागायती शेती नुकसान भरपाई – 32,000 प्रति हेक्टरी
  • कोरडवाहू शेतकऱ्यांना 35,000 मदत
  • दुधाळ जनावरांना 37,000 पर्यंत सहाय्य
  • गाळ भरलेल्या विहिरींसाठी 30,000 अनुदान
  • कुकुटपालनासाठी प्रति कोंबडी 100 मदत
  • घरं व झोपड्यांच्या पुनर्बांधणीसाठी 50,000 मदत
  • डोंगरी भागातील घरांना अतिरिक्त 10,000 सहाय्य
  • विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफी

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर थोडा ताण सहन करावा लागेल. पण सरकार शेतकऱ्यांच्या सोबत ठामपणे उभं आहे. अतिवृष्टीचं प्रमाण अपेक्षेपेक्षा अधिक होतं, म्हणूनच मदत तत्काळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चाही झाली असून केंद्र सरकारकडून विमा प्रक्रियेत गती आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या निर्णयामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील हजारो शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!