Today बुधवार, 29th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या भाजप खासदार, आमदारावर हल्ला; दगडफेकीत गाड्या फोडल्या

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या भाजप खासदार, आमदारावर हल्ला; दगडफेकीत गाड्या फोडल्या

कोलकाता: उत्तर बंगालमधील नागराकाटा परिसरात पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि स्थानिकांच्या मदतीसाठी पोहोचलेल्या भाजप खासदार खगेन मुर्मू आणि आमदार शंकर घोष यांच्यावर जमावानं हल्ला केला. हल्ल्यात दोन्ही नेते गंभीर जखमी झाले. त्याशिवाय, त्याच्या वाहनांवरही दगडफेक झाली. त्यांच्या कारचेही मोठे नुकसान झाले आहे. हल्ल्यात जबर जखमी झालेल्या भाजप नेत्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस या हल्ल्यामागे असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

स्थानिकांनी केलेल्या दगडफेकीत खासदार खगेन मुर्मू यांच्या डोक्याला गंभीर इजा झालेली आहे. तर शंकर घोष यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. त्यांच्या तोंडावर जखमा झाल्या आहेत. हल्यात ते अक्षरश: रक्तबंबाळ झाले. या घटनेनंतर परिसरात तणावाची परिस्थिती आहे. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप, प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेस असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

आपत्ती येऊन गेल्यावर बरेच दिवस लोटल्यावर लोकप्रतिनिधी आढावा घेण्यासाठी आल्यानं जनक्षोभ उसळल्याचं स्थानिक सांगत आहेत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. अद्याप तरी कोणालाही अटक झालेली नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!