Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गौतमी पाटीलला मोठा दिलासा! अपघात प्रकरणात पुणे पोलिसांकडून ‘क्लीन चीट’

गौतमी पाटीलला मोठा दिलासा! अपघात प्रकरणात पुणे पोलिसांकडून ‘क्लीन चीट’

पुणे: पुण्यातील नवले उड्डाणपुलाजवळ झालेल्या भीषण अपघाताप्रकरणी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिला पुणे पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. 30 सप्टेंबर रोजी गौतमी पाटीलच्या मालकीच्या कारने रिक्षाला धडक दिल्यामुळे हे प्रकरण प्रचंड गाजले होते, मात्र अपघाताच्या वेळी गौतमी पाटील गाडीत उपस्थित नव्हती, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. जखमी रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे यांच्या कुटुंबीयांनी गौतमी पाटीलवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. गौतमी पाटील ही सेलिब्रिटी असल्यामुळे पोलीस कारवाईत चालढकल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यानंतर कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही तातडीने कारवाईच्या सूचना दिल्यामुळे प्रकरणाने अधिकच जोर धरला. वाढत्या दबावामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती आणि गौतमी पाटीलला नोटीस देखील धाडली होती.

दरम्यान, तपास अपघातावेळी गौतमी पाटील गाडीत होती की नाही, हे निश्चित करण्यासाठी पोलिसांनी तब्बल 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये अपघात घडला तेव्हा गौतमी पाटीलचा चालक हाच फक्त कारमध्ये उपस्थित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निष्कर्षांमुळे पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला औपचारिकरित्या क्लीन चीट दिली आहे.

हेही वाचा – Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटीलचा ड्रायव्हर नशेत होता? रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर, नेमकं काय घडलं?

कुटुंबीयांकडून गंभीर प्रश्न उपस्थित

अपघातात गंभीर जखमी झालेले रिक्षाचालक मरगळे यांच्या कुटुंबीयांनी मात्र पोलिसांच्या तपासावर आणि गौतमी पाटीलच्या टीमवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, पहाटे पाच वाजता रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी असताना मागून आलेल्या कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी मोठी होती की रिक्षा तीन वेळा पलटी झाली. अपघातानंतर कारमधील लोक खाली उतरले आणि लगेच निघून गेले. अर्ध्या तासानंतर दुसरी व्यक्ती टोईंग व्हॅन घेऊन आली आणि गौतमी पाटीलची कार टो करून घेऊन गेली. जखमी रिक्षाचालक रस्त्यावर तसाच पडून होता.

हेही वाचा – Gautami Patil: गौतमी पाटीलच्या कार अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर; रिक्षाला धडक देण्यापू्र्वी कारमधून 2 व्यक्ती उतरल्याचे उघड

याशिवाय, पोलीस तपासादरम्यान आयत्यावेळी दुसऱ्याच कोणाला तरी ड्रायव्हर म्हणून सादर करण्यात आले, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ‘हायवेवरील कॅमेरे बंद’ असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी, पुण्यासारख्या शहरात हे कसे शक्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सध्या या अपघातात फक्त कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमी रिक्षाचालक मरगळे यांच्यावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!