Today गुरूवार, 28th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘भारत सनातनचा अपमान सहन करणार नाही…’, सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसमोर वकिलाचा गोंधळ

‘भारत सनातनचा अपमान सहन करणार नाही…’, सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसमोर वकिलाचा गोंधळ

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मोठा गोंधळ उडाला. एका वकिलाने सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यासमोर सनातन धर्माच्या कथित अपमानावरून तीव्र विरोध दर्शवला. या वकिलाने गोंधळ घालताना आपला बूट काढण्याचाही प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या वकिलाला न्यायालयातून बाहेर काढण्यास सुरुवात केली असता, तो ‘भारत सनातनचा अपमान सहन करणार नाही,’ अशा घोषणा देत ओरडला.

सरन्यायाधीशांच्या ‘त्या’ टिप्पणीमुळे वाद

या गोंधळाचे मूळ कारण सरन्यायाधीश गवई यांनी अलीकडेच खजुराहो येथील भगवान विष्णूच्या मूर्तीच्या पुनर्स्थापनेशी संबंधित खटल्याच्या सुनावणीदरम्यान केलेली टिप्पणी असल्याचे मानले जात आहे. याचिका फेटाळताना सरन्यायाधीश म्हणाले होते, ‘जा आणि देवाला काहीतरी करायला सांगा. तुम्ही म्हणता की तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात. तर आता जा आणि प्रार्थना करा.’ या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली होती. तथापी, अनेक युजर्सनी त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला होता.

‘मी सर्व धर्मांचा आदर करतो,’ सरन्यायाधीशांचे स्पष्टीकरण

सामाजिक माध्यमांवरील तीव्र टीकेनंतर दोन दिवसांनी सरन्यायाधीश गवई यांनी खुल्या न्यायालयात स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी सांगितले की, मी सर्व धर्मांचा आदर करतो. या घटनेनंतरही सरन्यायाधीश गवई यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना काम सुरू ठेवण्यास सांगितले आणि स्पष्ट केले की ते अशा घटनांमुळे प्रभावित होत नाहीत.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचे समर्थन

केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीशांचे समर्थन केले. सोशल मीडियावरील प्रतिक्रिया अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण असतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. गोंधळ घालणाऱ्या वकिलाने याच मागील घटनेमुळे संतप्त होऊन हे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!