Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Diwali 2025: दिवाळीनिमित्त एसटीचा नवा प्लॅन! सणासुदीच्या काळात पुण्यातून यंदा 589 विशेष बसची व्यवस्था

Diwali 2025: दिवाळीनिमित्त एसटीचा नवा प्लॅन! सणासुदीच्या काळात पुण्यातून यंदा 589 विशेष बसची व्यवस्था

पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांना चांगली व्यवस्था देण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. पुणे विभागातून प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 589 विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व जादा बस 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत सोडण्यात येणार आहेत. नोकरी, शिक्षण व व्यवसायानिमित्त राज्य आणि राज्याबाहेरील पुण्यात राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे.

दिवाळीसाठी एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून 15 ऑक्टोबरपासून जादा बस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय नियमित बसदेखील सुरू असणार आहेत. दिवाळीच्या काळात तिकिटामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे खासगी बसने जादा तिकीट देऊन प्रवास करणे टाळावे. प्रवाशांनी एसटीला प्राधान्य द्यावे, असे पुणे एसटी विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी म्हटले आहे.

दिवाळीसाठी हे नागरिक गावी जातात. सध्या रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यामुळे नागरिकांना एसटीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे दिवाळीच्या काळात एसटीला कायम गर्दी असते. खास करून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील नागरिक मोठ्या संख्येने गावी जातात. त्यासाठी एसटीकडून जादा बसची सोय केली जाते. यंदा दिवाळीच्या काळात नियमित बस व्यतिरिक्त जादा बस सोडण्यात येणार आहेत. जादा बसचे ऑनलाइन बुकिंग सुरू झाले आहे. नागरिक एसटी महामंडळाच्या संकेतस्थळ अथवा मोबाईलपवरून तिकीट बुकिंग करू शकतात. तसेच, एसटीच्या अधिकृत तिकीट बुकिंग केंद्रावर तिकीट आरक्षण सुरू झाले आहे.

स्वारगेट येथून 113 जादा बस:

पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी स्वारगेट एसटी बसस्थानक येथून नियमित बसबरोबरच 113 जादा बस सोडण्यात येणार आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकण या भागात जाणाऱ्या गाड्या स्वारगेट येथून सुटतील. तर, शिवाजीनगर येथून 80 जादा बस सोडण्यात येणार आहेत. यावेळी दररोज धावणाऱ्या निमयित गाड्या सुरू असणार आहेत. स्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून महामंडळाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड येथून 396 जादा बस सोडणार आहेत.

मराठवाडा, विदर्भासाठी 396 जादा बस :

मागील काही वर्षे दिवाळीच्या काळात खडकी कँन्टोमेंट येथून मराठवाडा, विदर्भासाठी जादा बस सोडण्यात येत होत्या. पण, यंदा खडकीची जागा योग्य नसल्यामुळे एसटी महामंडळाकडून नवीन जागेचा शोध घेतला जात होता. वाकडेवाडी बसस्थानकासमोर आरेची जागा देण्याची मागणी एसटीकडून करण्यात आली होती. पण, ही जागा पीएमआरडीएच्या ताब्यात असल्याने त्यांनी ही जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे शेवटी एसटी महामंडळाने पिंपरी-चिंचवड आगारातून जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला.

 

 

 

 

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!