Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणाला नवे वळण! रविंद्र धंगेकरांचा पुण्यातील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर गंभीर आरोप

पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणाला नवे वळण! रविंद्र धंगेकरांचा पुण्यातील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर गंभीर आरोप

Pune Crime: पुण्यातील कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारानंतर स्वित्झर्लंडकडे पळालेल्या निलेश घायवळ प्रकरणावर कारवाई कधी होईल, हा प्रश्न अजूनही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांना निलेश घायवळबाबत प्रश्न विचारण्यात आला होता, पण पाटीलांनी उत्तर देण्याऐवजी तिथेच वाट धरल्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेतून भाजप नेत्यावर टीका केली आहे.

निलेश घायवळ समीर पाटीलच्या संपर्कात

धंगेकरांनी म्हटले की, चंद्रकांत पाटील सध्या आत्मचिंतन करत असतील. ते पूर्ण आत्मचिंतनानंतरच निलेश घायवळबाबत बोलतील. मात्र निलेश घायवळ समीर पाटीलच्या संपर्कात होता, जो मोकाट गुन्ह्यांचा आरोपी आहे. त्यांनी समीर पाटील आणि निलेश घायवळ यांचा फोटोही पत्रकार परिषदेत दाखवला. धंगेकरांनी असेही म्हटले की, निलेश घायवळ संदर्भात पोलीस महासंचालक यांना देखील पत्र पाठवण्यात आले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना धडा शिकवावा. पुण्याला लागलेला गुन्हेगारीचा डाग पुसून काढला पाहिजे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

हेही वाचा – Nilesh Ghaywal : निलेश घायवळच्या घरावर पोलिसांचा छापा; जिवंत काडतुसे, ४० कागदपत्रे अन् बरंच काही…

जर गृह खात्याने ठरवलं, तर आजपासून 15 दिवसांत निलेश घायवळ टोळी महाराष्ट्रात दिसणार नाही. पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीवर जसा बुलडोझर चालवला आणि तपास शेवटपर्यंत केला, त्याचप्रमाणे या प्रकरणाचा तपासही होणे आवश्यक आहे. पोलीस खात्यातून दबका आवाज येतो, हा माणूस आम्हाला त्रास देतो, असंही धंनगेकर यांनी यावेळी नमूद केलं.


समीर पाटीलवर आरोप
धंगेकरांनी समीर पाटीलबाबतही गंभीर आरोप केले. तो चंद्रकांत पाटील यांच्याकडे लुडबुड करणारा आहे. तो दादाकडून गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना मदत करतो आणि पोलीसांना त्रास देतो. कोथरूडमधील गुन्हेगारी, निलेश घायवळ प्रकरणात पासपोर्ट आणि सरकारी कागदांमध्ये छेडछाड करणाचे कामही समीर पाटील करतो, असा खळबजनक आरोपही यावेळी धंनगेकर यांनी केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!