Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Diwali Firecracker Rules: पुण्यात रात्री १० नंतर फटाके फोडण्यावर बंदी; ‘ॲटमबॉम्ब’ बाळगण्यावर होणार कारवाई

Diwali Firecracker Rules: पुण्यात रात्री १० नंतर फटाके फोडण्यावर बंदी; ‘ॲटमबॉम्ब’ बाळगण्यावर होणार कारवाई

पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील फटाके वाजवण्याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सध्याचे वाढते प्रदूषण पाहता ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी नियमावली आखण्यात आली आहे. फटाके वाजवण्याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी रात्री १० नंतर बंदी घातली आहे. नियमांनुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पोलिसांच्या नियमांनुसार मोठा आवाज करणारे ‘ॲटमबाॅम्ब’ वाजवणे, बाळगणे, तसेच विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शहरातील रुग्णालये, तसेच शैक्षणिक संस्था, न्यायालयाच्या १०० मीटर परिसरात शांतता क्षेत्र आहे. या भागात दिवसा आणि रात्री फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेशात म्हटले आहे.

फटाके विक्रेत्यांनी नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे. पुणे शहर परिसरात २० ते २४ ऑक्टोबर या कालवधीत तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महामार्गावर, पुलावर फटाके वाजवणे, अग्निबाण (रॉकेट) उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा १२५ डेसिबलपेक्षा जास्त नसावी, नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमावलीचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!