पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स अर्थात ICAR येथे अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे वरिष्ठ संशोधन फेलो या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२५ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी प्रकल्प प्रमुख (डॉ. रोशनी समर्थ), आयसीएआर- नॅशनल रिसर्च सेंटर फॉर द्राक्षे, पी.बी. क्रमांक-३, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे- ४१२३०७ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://nrcgrapes.icar.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


