Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Vivo ने लाँच केला Vivo V60e स्मार्टफोन; तब्बल 200MP कॅमेरासह 6500mAh बॅटरीही मिळणार

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात आता चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo ने आपला नवीन स्मार्टफोन Vivo V60e भारतात लाँच केला आहे. कंपनीच्या V60 सीरीजमधील हा नवीन फोन असणार आहे. हा फोन अनेक शक्तिशाली फीचर्ससह येतो. यात मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर आहे. तो १२GB पर्यंत RAM आणि २५६GB पर्यंत स्टोरेज मिळत आहे.

या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअपही मिळत आहे. Vivo V60e मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६५००mAh बॅटरी देण्यात आली आहे. हँडसेटमध्ये AI Aura Light आहे. Vivo V60e तीन कॉन्फिगरेशनमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २९९९९ रुपये आहे. ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३१९९९ रुपये आहे. टॉप-ऑफ-द-लाइन १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३३९९९ रुपये आहे.

तुम्ही हा फोन दोन कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकता. एलिट पर्पल आणि नोबल गोल्ड हा कलर मिळणार आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल. तुम्ही हा फोन अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर देखील खरेदी करू शकता. विक्री १० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

असे आहेत स्पेसिफिकेशन्स? 

Vivo V60e मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह ६.७७-इंचाचा क्वाड-कर्व्हड AMOLED डिस्प्ले आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी डायमंड शील्ड ग्लास वापरला जातो. स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी ७३६० टर्बो प्रोसेसरने चालवला आहे. तो १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेजसह येईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!