Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bhide Bridge: दिवाळीपूर्वी पुणेकरांना दिलासा! 11 ऑक्टोबरपासून भिडे पूल तात्पुरता खुला राहणार

Bhide Bridge: दिवाळीपूर्वी पुणेकरांना दिलासा! 11 ऑक्टोबरपासून भिडे पूल तात्पुरता खुला राहणार

Reopening of Bhide Bridge: मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांमुळे काही आठवड्यांपासून बंद असलेला भिडे पूल अखेर तात्पुरता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागात अपेक्षित असलेल्या वाढत्या गर्दीचा विचार करून पुणे वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे.

सकाळी ६ ते रात्री १० वाहतुकीस परवानगी

पोलीस उपायुक्त (वाहतूक) अमोल झेंडे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ११ ऑक्टोबर २०२५ पासून पुढील आदेश येईपर्यंत दररोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत भिडे पुलावरून वाहनांना प्रवास करण्यास परवानगी असेल. हा निर्णय डेक्कन आणि विश्रामबाग परिसरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करून वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे.

हेही वाचा – Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी शहरातील ‘या’ भागातील पाणी पुरवठा राहणार बंद

कायदेशीर अधिनियमांतर्गत आदेश जारी

ही परवानगी मोटार वाहन कायद्याच्या कलम ११५, ११६(१)(अ)(ब), ११६(४) आणि ११७ अंतर्गत देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या उपाययोजनेमुळे सणासुदीच्या काळात वाढणाऱ्या खरेदी आणि उत्सवाच्या हालचालींमुळे होणारी वाहतूककोंडी टाळता येईल.

हेही वाचा – आमचा वेळ वाया जातो! TV वरील जाहिरातींमुळे त्रस्त पुणेरी आजींची थेट सुप्रिया सुळेंकडे तक्रार

वाहतूक निरीक्षणासाठी विशेष पथक

सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अडथळे टाळण्यासाठी विश्रामबाग आणि डेक्कन वाहतूक विभागातील कर्मचारी पुलावरील वाहतुकीवर सतत लक्ष ठेवणार आहेत. या निर्णयाचे परिसरातील नागरिक, व्यापारी आणि प्रवाशांनी स्वागत केले आहे. यामुळे अनेकांनी गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या वळण मार्गांच्या त्रासातून दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!