नवी दिल्ली : सध्या Vivo, Realme, OnePlus यांसारख्या कंपन्यांचे अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पण, सध्या चर्चा सुरु आहे ती Vivo च्या सर्वात स्वस्त 200MP कॅमेरा असणाऱ्या फोनची. कंपनीने Vivo V 60E हा फोन लाँच केला आहे. हा फोन शक्तिशाली प्रोसेसर आणि एक उत्कृष्ट कॅमेरासह येतो.
Vivo च्या या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७३६० टर्बो प्रोसेसरला सपोर्ट करणार आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त 200MP कॅमेरा असणारा कॅमेरा फोन आहे. हँडसेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. कंपनीने 50MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा डिव्हाईस अँड्रॉइड १५ सह मिळत आहे. जर तुम्ही शक्तिशाली प्रोसेसर आणि एक उत्कृष्ट कॅमेरा असलेला फोन शोधत असाल, तर हा फोन एक चांगला पर्याय असणार आहे. कंपनीने Vivo V 60E तीन कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केला आहे.
या स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 8GB RAM + 128GB स्टोरेजसह येतो आणि त्याची किंमत २९९९९ रुपये आहे. 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३१९९९ रुपये आहे. 12GB RAM + 256GB स्टोरेजसह टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंटची किंमत ३३९९९ रुपये आहे.


