महाराष्ट्र जागरण डेस्क: पाणी म्हणजेच जीवन, हे तुम्ही ऐकलेच असेल. चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिणे आवश्यक असतेच. परंतु तुम्ही रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू, थोडी हळद आणि मध मिसळून घ्या. याचे अनेक आश्चर्यकारक फायदे होतील. ते पुढीलप्रमाणे…
हळदीचे पाणी पिण्यामुळे. जेवण सहज पचण्यास मदत होते. यामुळे पोटाच्या समस्या कमी होतात. अनेक कारणाने शरीरावर सूज येते. परंतु तुम्ही जर हळदीचे पाणी प्यायला तर ही सूज कमी होते. या पाण्यात करक्युमिन नावाचे रसायन असते. यामुळे सूज कमी होण्यास मदत होते.
एक हळदीचे पाणी प्यायल्याने रक्त जमा होत नाही. यासोबतच धमन्यांमध्ये रक्त साचत नाही. हे पाणी सांधेदुखी आणि सूज दूर करण्यासाठी फायदेशीर असते. हे या रोगावर एका औषधीप्रमाणेच काम करते. हळदीचे पाणी प्यायल्यास साखरेवर नियंत्रण ठेवले जाऊन मधुमेहाची शक्यता कमी होते. हळदीमध्ये करक्युमिन असल्याने हे एक अँटीऑक्सिडेंट आहे. यामुळे कर्करोगाशी लढा देण्यास मदत करते.


