Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

वाढदिवशी लॉजवर नेऊन प्रेयसीची चाकुने हत्या, पुण्यातील लव्हस्टोरीचा भयंकर शेवट; प्रियकराचे पोलिसांसमोर आत्मसर्पण

वाढदिवशी लॉजवर नेऊन प्रेयसीची चाकुने हत्या, पुण्यातील लव्हस्टोरीचा भयंकर शेवट; प्रियकराचे पोलिसांसमोर आत्मसर्पण

पिंपरी चिंचवड: पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. हत्येची ही घटना वाकड परिसरातील एका लॉजवर झाली. विशेष म्हणजे हत्या करण्यापूर्वी आरोपीनं आपल्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा केला होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर दुसर्यादिवशी त्याने चाकू आणि ब्लेडने प्रेयसीवर वार केले त्यात तिचा जीव गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलावर सिंग असे आरोपीचे नाव आहे. तर, मेरी तेलगू असं मृत तरूणीच नाव आहे. दोघंही एकमेकांना सहा वर्षांपासून ओळखत होते आणि प्रेमसंबंधात होते. १० ऑक्टोबर रोजी मेरीचा वाढदिवस होता. त्यामुळे दोघंही वाकड परिसरात भेटले. दिलावरने वाकड येथील एका लॉजवर प्रेयसी मेरी तेलगूचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा केल्यानंतर अवघ्या काही तासात ११ ऑक्टोबर रोजी प्रियकर दिलावर सिंग याने मेरीवर चाकू आणि ब्लेडने वार करून तिची हत्या केली.

मेरी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात असल्याच्या संशयातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मेरी ही डी-मार्टमध्ये काम करत होती. तर दिलावर हा हॉटेल व्यावसायिक आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवरून दोघांची ओळख झाली होती. या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. हत्येनंतर आरोपी दिलावर सिंग याने थेट कोंढवा पोलीस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केले. दिलावरने मेरीवर केलेला हल्ला इतका भयंकर होता की यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ती रूमध्ये रकताच्या थारोळ्यात पडली होती.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!