Today शुक्रवार, 29th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nashik Crime : भाजपच्या सुनील बागुलांच्या पुतण्याला अखेर अटक, ‘या’ प्रकरणात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Nashik Crime : भाजपच्या सुनील बागुलांच्या पुतण्याला अखेर अटक, ‘या’ प्रकरणात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

नाशिक : नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखालील नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गंगापूर तालुक्यातील विसे मळा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल, पप्पू जाधव आणि एका अन्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.

यापूर्वी या प्रकरणात बागुल यांचे समर्थक मामा राजवाडे आणि अमोल पाटील यांना गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यांना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असली, तरी राजवाडे यांनी पोलिस मारहाणीचा आरोप करून न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, वैद्यकीय तपासणीत त्याच्या तक्रारीत तथ्य आढळले नाही.

या प्रकरणात मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरीसा अद्याप फरार असून, पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. सचिन साळुंखे गोळीबार प्रकरणात अजय बागुल, बॉबी गोवर्धने, विक्की उर्फ वैभव आणि चार अन्यांवर गुन्हा दाखल झाला असून, एकूण सात जणांवर कारवाई झाली आहे. हे प्रकरण राजकीय नेत्यांच्या गुन्हेगारीशी जोडले गेले असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मागील महिन्यांत नाशिकमधील गुन्हेगारी वाढल्याने मुख्यमंत्री स्तरावर चर्चा झाली असून, पोलिसांची ही कारवाई त्याचेच फलित मानली जात आहे.

ऑरा बार गोळीबार प्रकरण काय?

दरम्यान, सातपूर पोलिस स्टेशन हद्दीत आयटीआय सिग्नल परिसरातील ‘ऑरा बार’बाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) पदाधिकारी प्रकाश लोंढे, त्यांचा मुलगा दीपक उर्फ नानाजी लोंढे आणि भूषण लोंढे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल आहे.

२० वर्षीय विजय तिवारीवर गोळीबार करण्यात आला असून, हे भूषण लोंढे यांच्या पूर्वनियोजित षडयंत्राचा भाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणात एकूण १२ संशयितांवर गुन्हा दाखल असून, प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांना अटक करण्यात आली आहे. भूषण लोंढे मात्र फरार असून, पोलिसांनी त्याच्या शोधार्थ तीन विशेष पथके रवाना केली आहेत.

पोलिसांनी भूषण लोंढे याने वापरलेली वाहने जप्त केली असून, दोन वाहनचालकांना ताब्यात घेतले आहे. गोळीबारात वापरलेली रिव्हॉल्व्हरही हस्तगत करण्यात आली आहे. तपासात ‘ऑरा बार’वरील कब्जा आणि खंडणीची रक्कम तिप्पट करण्याच्या उद्देशाने लोंढे टोळीने हा हल्ला केल्याचे उघड झाले आहे.

हे प्रकरण ‘प्रोटेक्शन मनी’च्या वादातून घडले असून, पीएल ग्रुपचा म्होरक्या भूषण लोंढे याने पसार होण्यासाठी नाईस संकुलातील बिअर बारमधून गोळीबार केला होता. जखमी तिवारीची प्रकृती धोक्याबाहेर असून, पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने तपासाला गती दिली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!