Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

लग्नाचं आमिष, नाव ‘माहेर’चं… अन् टोळी चंद्रपूरची! ऑनलाईन फसवणूक प्रकरणात 5 महिलांना अटक

लग्नाचं आमिष, नाव ‘माहेर’चं… अन् टोळी चंद्रपूरची! ऑनलाईन फसवणूक प्रकरणात 5 महिलांना अटक

Pune Crime: शिरूर तालुक्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अनाथ मुलींचं लग्न लावून देतो असं सांगत, शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील ‘माहेर’ संस्थेच्या नावाने ऑनलाईन पैसे उकळणाऱ्या एका महिला टोळीचा पर्दाफाश शिक्रापूर पोलिसांनी केला आहे. या टोळीतील सर्व सातही सदस्य महिला असून, त्यापैकी पाच जणींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ही कारवाई थेट चंद्रपूर जिल्ह्यात धाड घालून केली असून, उर्वरित दोन आरोपी महिलांचा शोध सुरू आहे.

कोकणातील फिर्यादी, चंद्रपूरची टोळी
या फसवणुकीचा बळी कोकणातील मालवण (जि.सिंधूदुर्ग) येथील नारायण शिरोडकर हा नागरिक ठरला. आपल्या भाच्याच्या लग्नासाठी सोशल मीडियावर शोध घेत असताना, शिरोडकर यांचा संपर्क संगीता भोसले नावाच्या महिलेबरोबर झाला. तिने स्वतःला वढू बुद्रुक (ता.शिरूर, जि.पुणे) येथील ‘माहेर संस्था’तील कार्यकर्ती असल्याचं सांगत अनाथ मुलींच्या लग्नाची सोय करून देण्याचं आश्वासन दिलं.

त्यासाठी ७ हजार, १२ हजार आणि १९ हजार रुपये अशा तीन हप्त्यांमध्ये रक्कम मागवून घेतली. पैसे मिळाल्यानंतर आरोपीने शिरोडकर यांना “माहेर” संस्थेच्या नावाने सहमतीपत्र आणि पावत्या पाठवल्या. मात्र ती सर्व कागदपत्रं बोगस निघाली. यानंतर संबंधित महिलेने संपर्क तोडला. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर शिरोडकर यांनी थेट शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

चंद्रपूरमध्ये धाड

दरम्यान, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार महेंद्र पाटील, उद्धव भालेराव, आणि रुपाली निंभोरे यांच्या पथकाने चंद्रपूरकडे मोर्चा वळवला. तेथे सापळा रचून सपना भाऊराव पोडे (वय २६, रा. विसापुर, ता. बल्लारशाह), प्रियंता नितेश जांगळे (वय ३३, रा. दुर्गापूर), भूमिका सुरेश सौंदरकर (वय २४, रा. तुकुम), प्रांजली सुभाष सुखदेवे (वय २०, रा. वरोरा), आचल आशिष बोरेवार (वय २५, रा. तुकुम) या आरोपी महिलांना अटक करण्यात आली. या पाचही महिलांना शिरूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून, आणखी दोन महिलांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा – दारूसाठी दोन मुलांनी आईला संपवलं! खलबत्त्याने डोक ठेचून केली निर्घृण हत्या

तथापी, तपासातून उघड झालं की, या टोळीने लग्न जमवणाऱ्या ऑनलाईन मागणीचा फायदा घेत अनाथ मुलींचं लग्न लावतो असा भावनिक सापळा रचला. उच्चशिक्षित मुलींच्या अपेक्षा आणि उपवर मुलांच्या लग्नातील अडचणी याचा अभ्यास करून या टोळीने ‘मागणी-पुरवठा सिध्दांतावर’ आधारित फसवणुकीचा मॉडेल उभा केला, असं पोलिसांनी सांगितलं.

फक्त सोशल मीडियावर मार्केटिंग

टोळीने आपलं संपूर्ण कामकाज फक्त सोशल मीडियावरून चालवलं. पोलिसांच्या मते, ही टोळी गेल्या अनेक महिन्यांपासून सक्रिय असून, अशा स्वरूपाचे इतर गुन्हेही पुढे उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात संस्थेच्या नावाचा गैरवापर झाल्याने पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सांगितले की, वढू बुद्रुकमधील ‘माहेर’ संस्था ही अनेकांसाठी आधार ठरलेली आहे. त्यांच्या नावाने कुणी संपर्क साधल्यास किंवा पैसे मागितल्यास लगेच शिक्रापूर पोलिस ठाण्यात माहिती द्यावी. आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!