Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दारूसाठी दोन मुलांनी आईला संपवलं! खलबत्त्याने डोक ठेचून केली निर्घृण हत्या

दारूसाठी दोन मुलांनी आईला संपवलं! खलबत्त्याने डोक ठेचून केली निर्घृण हत्या

Kolhapur Crime News: कोल्हापूर व तासगावमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारूच्या व्यसनात बुडालेल्या मुलांनी स्वतःच्या जन्मदात्या आईचा जीव घेतल्याच्या दोन वेगवेगळ्या पण थरकाप उडवणाऱ्या घटना महाराष्ट्रात समोर आल्या आहेत. केवळ दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून संतप्त मुलांनी आपल्या आईचा निर्दयपणे खून केला आहे. एक घटना कोल्हापुरातील तर दुसरी तासगाव येथील असून, दोन्ही प्रकरणांत आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पैशासाठी सावत्र आईची खलबत्त्याने ठेचून हत्या

राजेंद्रनगर येथील भारतनगरमध्ये बुधवारी (दि. १५) सकाळी घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. विजय अरुण निकम (वय ३५) या दारूच्या आहारी गेलेल्या तरुणाने आपल्या सावत्र आई सावित्रीबाई निकम (वय ५३) यांचा खलबत्त्याने डोके ठेचून जागीच खून केला. दारूसाठी पैसे मागितल्यावर त्यांनी नकार दिल्याचा राग मनात धरून हा भयानक हल्ला करण्यात आला. सावित्रीबाई महाद्वार रोड परिसरात किरकोळ वस्तू विकून उदरनिर्वाह करत होत्या. विजय सेंट्रिंग आणि डिजिटल बोर्ड पेस्टिंगचे काम करायचा, मात्र दारूच्या व्यसनामुळे घरात सतत कलह होत असे. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी व दोन मुली विजापूर येथे निघून गेल्या होत्या.

हेही वाचा – हृदयद्रावक! सासरच्या जाचाला कंटाळून बीडमधील तरुणाची आत्महत्या

घटनेनंतर विजयने आपल्या बहिणीला फोन करून आईचा खून केला असे सांगितले. माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्याला ताब्यात घेतले. आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. रोहिणी पोर्लेकर (वय २९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला.

तासगावात तलवारीने वार करत आईचा जागीचा खून

दुसरी धक्कादायक घटना तासगावमधील इंदिरानगर झोपडपट्टी भागात मंगळवारी (दि. १४) रात्री घडली. दारूच्या नशेत जगन चरण पवार (वय ४४) याने किरकोळ कारणावरून आई शांताबाई चरण पवार (वय ७०) यांच्याशी वाद घातला. वाद विकोपाला गेल्यावर त्याने घरातील तलवार उचलून आईवर वार केला. या क्रूर हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

या दोन्ही घटनांनी कोल्हापूर आणि तासगाव परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. आईचा असा अंत, तोही स्वतःच्या मुलाच्या हातून, हे समाजातील विघटन आणि व्यसनाधीनतेचं भयावह चित्र उभं करत आहे. पोलीस या दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!