Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बंडू आंदेकरचा आणखी एक प्रताप! बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बंडू आंदेकरचा आणखी एक प्रताप! बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Pune Crime: कोंढवे धावडे येथील एका ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी कुख्यात गुंड सूर्यकांत राणोजी आंदेकर उर्फ बंडू आंदेकर (Bandu Andekar) आणि त्याच्या साथीदारांवर उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००९ ते २०२४ या कालावधीत घडलेल्या या प्रकरणात बनावट दस्तऐवज तयार करून फ्लॅट विक्री व आर्थिक अपहार केल्याचे समोर आले आहे.

या फसवणूक प्रकरणात बंडू आंदेकर याच्यासह महेश रामचंद्र तिखे आणि अविनाश रामचंद्र पवार यांचा भाऊ अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित व्यावसायिक (वय ७०) यांनी याबाबत तक्रार दाखल केली असून, त्यांनी स्वतःच्या मालकीची ५५ आर क्षेत्रफळाची जमीन विश्वासाने आरोपींना बांधकामासाठी दिली होती.

हेही वाचा –आमदार बापू पठारेंना मारहाण प्रकरण; बंडू खांदवेसह 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल

बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदारांची कोणतीही संमती न घेता संबंधितांनी सदर फ्लॅट विक्री करून मिळालेली रक्कम आपआपसात वाटून घेतली. त्याचबरोबर, बनावट खरेदी व्यवहार दाखवून दस्तऐवज तयार करण्यात आले व त्याच्या आधारे बेकायदेशीरपणे कर्जही उचलण्यात आले. तसेच, तक्रारदारांच्या मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचाही प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. सदर प्रकरणी उत्तमनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!