Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

हृदयद्रावक! सासरच्या जाचाला कंटाळून बीडमधील तरुणाची आत्महत्या

हृदयद्रावक! सासरच्या जाचाला कंटाळून बीडमधील तरुणाची आत्महत्या

बीड: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आत्महत्या केलेल्या तरुणाने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुणाचे नाव भागवत अंकुश राठोड (रा. गेवराई तालुका, बीड) असे आहे. याप्रकरणी त्याची आई सुनिता राठोड यांनी तलवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारीनुसार, भागवतला त्याची पत्नी राणी राठोड, सासरा संतोष राठोड आणि मामेसासरा दत्ता राठोड हे सतत मानसिक त्रास देत होते. या सततच्या छळामुळे तो खोल नैराश्यात गेला होता.

दरम्यान, 1 ऑक्टोबर रोजी भागवत राठोडने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यात सासरच्या मंडळींनी दिलेल्या त्रासाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मुलाच्या निधनानंतर काही दिवसांनी दुःखातून सावरल्यानंतर भागवतच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सध्या तलवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, भागवतने नेमके कोणत्या परिस्थितीत हे टोकाचे पाऊल उचलले याचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा –वाढदिवशी लॉजवर नेऊन प्रेयसीची चाकुने हत्या, पुण्यातील लव्हस्टोरीचा भयंकर शेवट; प्रियकराचे पोलिसांसमोर आत्मसर्पण

सासरकडून होणाऱ्या त्रासामुळे महिला आत्महत्या करतात, अशा बातम्या नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र या प्रकरणात एका पतीनेच सासरच्या छळाला कंटाळून जीव देण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. समाजात अशा घटना रोखण्यासाठी मानसिक आधार आणि संवेदनशीलतेची गरज असल्याची चर्चा सुरु आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!