Today शनिवार, 19th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime News: भंगार दुकानात चोरी करणे बेतले जीवावर; रात्रभर मारहाणीत एकाचा मृत्यू, दोन जखमी

Pune Crime News: भंगार दुकानात चोरी करणे बेतले जीवावर; रात्रभर मारहाणीत एकाचा मृत्यू, दोन जखमी

पुणे: पुण्यामध्ये गुन्हेगारीचे सत्र दिवसेंदिवस सुरूच आहे. शहरातील चंदननगर परिसरात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक प्रकार घडली आहे. भंगाराच्या दुकानात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्याला दुकानमालक आणि कामगारांनी पकडून रात्रभर बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका चोरट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. तर, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृत चोरट्याचं नाव नवाज इम्तियाज खान (वय २६) असं आहे.

ही घटना रात्री ३ च्या सुमारास चंदननगर परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तिघे चोरटे चोरीसाठी एका भंगाराच्या दुकानात शिरले होते. मात्र त्यावेळी दुकानातील काही कामगार जागे झाले आणि त्यांनी चोरट्यांना पकडलं. संतापलेल्या कामगारांनी चोरट्यांचे हातपाय बांधून त्यांना बेदम मारहाण केली.

या मारहाणीत नवाज खान या चोरट्याचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित दोन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी घटनेची माहिती पोलिसांना मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी चोरट्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर मृत नवाज खानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दुकान मालक आणि संबंधित काही कामगारांना ताब्यात घेतले असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!