Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात पीएमपीचा प्रवास आता हायड्रोजनच्या दिशेने होणार; पर्यावरणपूरकदृष्टीने नवा पर्याय

पुण्यात पीएमपीचा प्रवास आता हायड्रोजनच्या दिशेने होणार; पर्यावरणपूरकदृष्टीने नवा पर्याय

पुणे: केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान अंतगर्त हायड्रोजनवरील बसची चाचणी बुधवारी पुण्यात घेण्यात आली. पुढील सात दिवस शहरातील विविध भागांमध्ये ही चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत हायड्रोजन बसचा वापर करण्यात येणार आहे.

देशात दिल्ली आणि बडोद्यात हायड्रोजन इंधनावरील बस धावत आहेत. पुण्यातही चाचणी घेण्यात आली. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), पीएमपी, टाटा मोटर्स आणि इंडियन ऑईल यांच्या समन्वयातून बुधवारी औंध येथील रस्त्यावर बसची चाचणी घेण्यात आली. ‘महाऊर्जा’ प्रकल्प विभागाचे महाव्यवस्थापक आनंद रायदुर्ग, पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे आदी उपस्थित होते.

‘राष्ट्रीय पातळीवर इंधनाच्या बदलत्या किमती, कार्बन उत्सर्जनामुळे वाढते प्रदूषण या कारणांमुळे सरकारकडून पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यात येत आहे. त्यानुसार पुढील सात दिवस शहरातील वर्दळीचे रस्ते, महामार्ग यावर या बसची चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणीदरम्यान, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय), केंद्रीय वाहतूक संस्था (सीआयआरटी), महाऊर्जा, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) अधिकारी, तसेच टाटा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. चाचणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटी दूर करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे,’ असे ‘महाऊर्जा’ प्रकल्प विभागाचे महाव्यवस्थापक आनंद रायदुर्ग यांनी सांगितले.

बसची वैशिष्ट्ये

प्रवासी क्षमता 35 आसन, 10 उभे

वेग क्षमता ताशी 70 किलोमीटर

इंधन क्षमता 1 किलोमध्ये 11 किलोमीटर

एकूण वहन क्षमता 70 किलोमध्ये 250 किलोमीटर

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!