गांधीनगर : गुजरातमधील भाजप सरकारमध्ये मोठा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळात २५ नेत्यांनी शपथ घेतली. गुरुवारी (१६ ऑक्टोबर) मुख्यमंत्री वगळता सर्व १६ मंत्र्यांनी राजीनामे सादर केले होते, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
आज (१७ ऑक्टोबर) दुपारी ११.३० वाजता गांधीनगरमधील महात्मा मंदिरात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते हा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. यात ६ जुन्या मंत्र्यांची पुनरावृत्ती झाली असून, १९ नवीन चेहऱ्यांचा समावेश झाला आहे. यापैकी हर्ष संघवी यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली, तर क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा पहिल्यांदा मंत्रिमंडळात सामील झाल्या.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शपथविधीपूर्वी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतली आणि नव्या मंत्रिमंडळाची माहिती दिली. सूत्रांनुसार, हा विस्तार भविष्यातील निवडणुकांसाठी (जसे की २०२७ विधानसभा) पक्षाची प्रतिमा मजबूत करण्यासाठी घेण्यात आला आहे. यात क्षत्रिय, पटेल आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व वाढवण्यावर भर देण्यात आला असून, तीन नव्या महिला नेत्यांचा समावेश झाला आहे. कॅबिनेट पोर्टफोलिओची घोषणा लवकरच होईल.
संपूर्ण नव्या मंत्र्यांची यादी
त्रिकम छंगा
दर्शन वाघेला
स्वरूपजी ठाकोर
रूशिकेश पटेल
प्रवीणकुमार माली
रूशिकेश पटेल
पीसी बरंडा
अर्जुन मोढवाडिया
कुंवरजी बावलिया
कांतिलाल अमृतिया
रिवाबा जाडेजा
कमलेशभाई पटेल
डॉ. प्रद्युम्न वाजा
परषोत्तम सोलंकी
कौशिक वेकारिया
रमणभाई सोलंकी
हर्ष संघवी
संजयसिंह महीदा
मनीषा वकील
रमेशभाई कटारा
ईश्वरसिंह पटेल
प्रफुल्ल पंसेरिया
नरेश पटेल
कनुभाई देसाई
डॉ. जयरामभाई गामित


