Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत मोठी चूक! लँडिंग करताना हेलिकॉप्टरचे चाक हेलिपॅडमध्ये रुतले

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत मोठी चूक! लँडिंग करताना हेलिकॉप्टरचे चाक हेलिपॅडमध्ये रुतले

President Draupadi Murmu Security Lapse: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी समोर आली आहे. बुधवारी (२२ ऑक्टोबर) शबरीमला यात्रेसाठी निघालेल्या राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरला केरळमधील एका नव्याने तयार केलेल्या हेलिपॅडवर उतरवताना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. हेलिकॉप्टरची चाके हेलिपॅडवरील न सुकलेल्या काँक्रीटमध्ये अडकली, ज्यामुळे थोडा वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रपतींच्या भेटीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवारी (२१ ऑक्टोबर) संध्याकाळी हेलिपॅड बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्रीतून तातडीने काँक्रीट ओतण्याचे काम सुरू करण्यात आले आणि बुधवारी सकाळपर्यंत हेलिपॅड तयार करण्यात आले. मात्र, काँक्रीट पूर्णपणे सुकले नसल्याचा राज्य गुप्तचर विभागाने आधीच इशारा दिला होता. तरीही हेलिकॉप्टर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आणि परिणामी चाके ओलसर पृष्ठभागात अडकली.

हेही वाचा – लोणी काळभोर भागात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृ्त्यू; एकात पादचाऱ्याने तर, दुसऱ्यात दुचाकीस्वाराने जीव मगावला

या घटनेनंतर पोलिस आणि अग्निशमन दलाने तत्काळ कारवाई करत हेलिकॉप्टर सुरक्षितपणे बाहेर काढले. सुदैवाने, या घटनेत राष्ट्रपती मुर्मू आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व अधिकारी सुरक्षित आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही मिनिटांतच हेलिकॉप्टर पुन्हा सामान्य स्थितीत आणण्यात आले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राष्ट्रपतींचा प्रवास रस्त्याने की हवाई मार्गाने होणार हे पहाटे ४ वाजेपर्यंत निश्चित झाले नव्हते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तयारी अपुरी राहिल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शबरीमला येथील भगवान अय्यप्पा मंदिरात पूजा करणार असून त्या या पवित्र मंदिरात पूजा करणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रप्रमुख ठरणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!