Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

लोणी काळभोर भागात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृ्त्यू; एकात पादचाऱ्याने तर, दुसऱ्यात दुचाकीस्वाराने जीव मगावला

लोणी काळभोर भागात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृ्त्यू; एकात पादचाऱ्याने तर, दुसऱ्यात दुचाकीस्वाराने जीव मगावला

पुणे : लोणी काळभोरमधील थेऊर परिसरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. थेऊर परिसरात भरधाव मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकाश केशव श्रीमंदिलकर असे मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱी ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत श्रीमंदिलकर यांचे नातेवाईक गोरोबा केसू कुंभार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमंदिलकर हे १७ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास थेऊर परिसरातून निघाले होते. त्यावेळी भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या श्रीमंदिलकर यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या मोटार चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करत आहेत.

थेऊर-कोलवडी रस्त्यावर मुळा-मुठा नदीच्या पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. महेंद्रसिंग वाघसिंग राजपुरोहित असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत राजपुरोहित याचा भाऊ कपील याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार महेंद्रसिंग हा १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमाारास थेऊर-कोलवडी रस्त्याने निघाला होता. मुळा-मुठा नदी पुलाजवळ भरधाव वाहनाने दुचाकीस्वार महेंद्रसिंग याला धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळीथांबता वाहनचालक पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!