Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोबाईलमुळे धावत्या ट्रेनमध्ये अचानक स्फोट! जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी मारल्या चालत्या ट्रेनमधून उड्या

मोबाईलमुळे धावत्या ट्रेनमध्ये अचानक स्फोट! जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी मारल्या चालत्या ट्रेनमधून उड्या

Jansewa Express Fire: धावत्या ट्रेनमध्ये अचानक स्फोटाचा आवाज झाला आणि काही क्षणातच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण डबा व्यापला. प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी घाबरून ट्रेनमधून उड्या मारायला सुरुवात केली. अंगावर काटा आणणारी ही घटना अमृतसर-सहरसा जनसेवा एक्सप्रेस (गाडी क्रमांक १४६१८) मध्ये घडली. राजस्थान आणि आंध्र प्रदेशमधील बसला आग लागल्याची घटना अजून ताजी असतानाच, आता ट्रेनमध्ये लागलेल्या आगीने पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील सोनवर्षा कचहरी रेल्वे स्टेशनजवळ शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. जनसेवा एक्सप्रेस निर्धारित वेगाने पुढे जात असताना अचानक एका डब्यातून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला बाहेर येऊ लागल्या. काही क्षणांतच प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळ पसरला.

मोबाईल ब्लास्टमुळे लागली आग

प्रत्यक्षदर्शी प्रवाशांच्या माहितीनुसार, एका प्रवाशाच्या मोबाईल फोनमध्ये अचानक स्फोट झाला, आणि त्यानंतर काही सेकंदांतच आग लागली. पाहता पाहता आगीने विक्राळ रूप घेतलं आणि डब्यातील प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी घाईगडबडीत बाहेर उड्या मारल्या.

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ

परिस्थिती गंभीर होताच लोको पायलटने तात्काळ ट्रेन थांबवली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित आग विझवण्याचे काम सुरू केले. स्थानिक प्रशासन व अग्निशमन दलालाही तत्काळ कळविण्यात आले. काही मिनिटांतच आग नियंत्रणात आणण्यात यश आलं. कर्मचाऱ्यांच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे आग इतर बोग्यांमध्ये पसरली नाही आणि मोठा अपघात टळला.

सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, काहींना धूर व उष्णतेमुळे किरकोळ त्रास झाल्याचं समजतं. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी संपूर्ण ट्रेनची तपासणी केली. तांत्रिक पथकाने सुरक्षा तपासणीनंतर ट्रेन पुन्हा मार्गस्थ केली. जनसेवा एक्सप्रेस अखेरीस सुरक्षितपणे सहरसा स्थानकावर पोहोचली. रेल्वे प्रशासनाने घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!