Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gold Rate : सोन्याच्या दारात मोठी घसरण; चार दिवसात ७ हजारांनी सोनं झालं स्वस्त, वाचा नवे दर काय?

Gold Rate : सोन्याच्या दारात मोठी घसरण; चार दिवसात ७ हजारांनी सोनं झालं स्वस्त, वाचा नवे दर काय?

Gold Price Today Down : गेल्या आठवड्यात ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण नोंदवली गेली. चार दिवसांत प्रति तोळा सोन्याची किंमत सुमारे ७,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही हे चित्र आहे, तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि देशांतर्गत सराफा बाजारातही किंमती घसरल्या. आठवड्याच्या सुरुवातीला प्रति तोळा १ लाख ३० हजारांपर्यंत पोहोचलेल्या सोन्याची किंमत आता १ लाख २३ हजारांपर्यंत खाली आली आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील आठवड्यातही घसरण होण्याची शक्यता आहे.

पाच दिवसांत ७,३६९ रुपयांची घसरण

MCX वर ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीतही मोठा बदल दिसला. सोमवारी प्रति तोळा ₹१,३०,६२४ इतकी किंमत असताना, शुक्रवारी ती ₹१,२३,२५५ पर्यंत खाली आली. ही घसरण आंतरराष्ट्रीय घटकांमुळे झाली असल्याचे सांगितले जाते.

देशांतर्गत बाजारात घसरण

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या संकेतस्थळानुसार, देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याचे दर घसरले. आठवड्याच्या सुरुवातीला प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ₹१,२७,६३३ इतकी होती. दुसऱ्या दिवशी बाजार बंद असल्याने, बुधवारी सुरुवातीला घसरण सुरू झाली आणि शुक्रवारी ती ₹१,२१,५१८ पर्यंत पोहोचली. आठवडाभरात प्रति तोळा ६,११५ रुपयांची घसरण झाली. आज (२६ ऑक्टोबर) अपडेटेड दर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेटसाठी ₹१,२१,५२० आहेत.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!