Indapur Bus Fire: इंदापूर बस स्थानकात मध्यरात्रीच्या सुमारास धाराशिव-पुणे एसटी बसला आग लागल्याची घटना घडली. आगीच्या घटनेवेळी एसटीत 50 प्रवासी होते. सुदैवानं यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मध्यरात्री दोन वाजता इंधन गळतीमुळे बसने पेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. एसटीमध्ये जवळपास 50 प्रवासी अल्याने सगळ्यांचा जीव धोक्यात आला होता. सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. प्रवासी पटकन बसमधून खाली उतरल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, त्यांचे सामान बससकट जळून खाक झाले.
आगीच्या घटने आधी काही मिनीटेच धाराशिव पुणे बस मध्यरात्री दोन वाजचा इंदापूर बस स्थानकाच्या फलाट क्रमांक 11 वर आली होती. तेथे बस उभी असतानाचा बसमधून इंधन गळती झाली. या इंधन गळतीमुळेच बसला अचानक आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. ज्यावेळी आग लागली त्यावेळी बसमध्ये जवळपास 50 प्रवासी होते. त्यामुळे अचानक एकच गोंधळ उडाला. प्रवाशांनी कसाबसा आपला जीव वाचवला.
सध्या सर्व परिस्थीती नियंत्रणात आहे. मात्र, या घटनेमुळे पुन्हा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. ज्या ५० प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता.


