पाबळ : भिर्रर्र…झाली…..! पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटातून पुणे जिल्हा परिषदेसाठी प्रमुख इच्छुक असलेले वढु बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवलेंसाठी करंदी ग्रामस्थांकडून येत्या शुक्रवार-शनिवारी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवारासाठी, करंदी गावातील ग्रामस्थांनी बैलगाडा शर्यती भरविण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. हे आयोजन करंदीतील करंदी शिवजयंती उत्सव समितीचे वतीने करण्यात आले आहे.
करंदी ग्रामस्थांचा पुढाकार आणि नव्या घाटात शर्यती
गेल्या दिड महिन्यात वढु बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले व त्यांच्या समर्थकांनी पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटातील तब्बल 15 हजार भाविकांसाठी 5 रेल्वे गाड्यांनी थेट उजैन-महाकाल येथे धार्मिक तिर्थाटन घडवून आणले. एवढेच नाही तर आणखी 3 धार्मिक यात्रांचे नियोजनही येत्या काही दिवसात पूर्ण केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटातील सर्व 14 गावांमधील बैलगाडा शौकीनांच्या आग्रहाखातर शिवजयंती उत्सव समितीने पुढाकार घेतला. सर्व बैलगाडा शर्यती गाडा मालक व गाडा शौकीनांना घेऊन येत्या शुक्रवार (दि.31 आक्टोबर) व शनिवार (दि.1 नोव्हेंबर) या दोन दिवशी भव्य बैलगाडा घाटात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेसाठी विजेत्यांसाठी बक्षीसांची खैरातही करण्यात आली आहे. पहिल्या नंबरच्या विजेत्यासाठी 1 लाख रुपये तर फळीफोड गाड्यासाठीही 1 लाखांचे रोख बक्षीस ठेवण्यात आले आहे.
शर्यतींसाठी दोन लाख रोख आणि चार दुचाकींसह मोठी बक्षीसे
या शिवाय एक, दोन व तिन नंबरच्या फायनल विजेत्यांसाठी तिनही गटात दोन-दोन टू व्हिलर ठेवण्यात आल्या आहेत. तसेच चार फ्रीज, चार एलसीडी टिव्ही, चार कुलर, दोन टेबल फॅन अशी वस्तुस्वरुपातील बक्षीसेही या शर्यतींसाठी ठेवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेत केवळ पाबळ, केंदूर, धामारी, मुखई, हिवरे, खैरेनगर, खैरवाडी, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, करंदी, वाजेवाडी, पिंपळे-जगताप, वढु बुद्रुक, आपटी आदी गावांमधील बैलगाडा मालक आपापल्या गाड्यांसह सहभागी होणार आहेत.
असे आहे शर्यतींचे आयोजन
– शर्यती पूर्ण शासकीय नियमांनुसार होणार
– टोकन : ऑनलाईन पध्दतीने 25,26 व 27 तारखेला.
– टोकन फी परत देण्याच्या अटीवर : रु.2,000
– लकी ड्रॉ : 27 तारखेला होईल आणि त्याची पीडीएफ 27 तारखेला पाठविली जाईल.
ऑनलाईन टोकनसाठी संपर्क साधा
नवनाथ नप्ते : 90114-00720
प्रविण बगाटे : 83901-32929
मच्छिंद्र ढोकले : 98816-87758


