Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

व्होट चोरी म्हणजे निवडणूक चोरी; अदित्य ठाकरेंकडून पुरावे दाखवत निवडणूक आयोगाची ‘पोलखोल’

व्होट चोरी म्हणजे निवडणूक चोरी; अदित्य ठाकरेंकडून पुरावे दाखवत निवडणूक आयोगाची ‘पोलखोल’

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली. (Mumbai) त्यामध्ये व्हिडिओ स्क्रिनींगवर प्रेझेंटेशनद्वारे निवडणूक आयोगाने मतदार यांद्यामध्ये काय घोळ केला आहे हे दाखलं. यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसह शिवसेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणचे थेट पुरावेच दिले. त्यांच्या या पत्रकार परिषदेमुळे आता महाराष्ट्रात विरोधी पक्ष निवडणूक आयोगाच्या विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षाचा आज निर्धार मेळावा आयोजीत केला आहे. त्या मेळाव्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी हे प्रेझेंटेशन केलं आहे.

मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे, असा दावा यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला. हा दावा करताना त्यांनी काही आकडेवारी सादर केली. सोबतच त्यांनी काही फोटो, मतदारांचे मतदान कार्ड सादर केले. हा कथित घोळ त्यांनी पुराव्यानीशी दाखवून दिला आहे. तसेच हा कथित घोळ थांबवायचा असेल तर गटप्रमुखांनी सावध राहायला हवे. तुमच्याकडे असलेल्या मतदार यादीतील नावांचे वाचन झाले पाहिजे. आपण या मतदारांना ओळखतो का? हे पाहिले पाहिजे, अशा सूचना केल्या.

व्होट चोरी म्हणजे निवडणूक चोरी. लोकसभेनंतर महाविकास आघाडीचे सरकार येणार असं वाटत होतं. पण यांनी मतदानाची चोरी केली. मला जे कोणी भेटायचे ते म्हणायचे की आदित्य काहीतरी गडबड झाली आहे, असं आदित्य ठाकरे यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हणाले. कोणी म्हणत होतं की ईव्हीएममध्ये गडबड आहे. तर कोणी म्हणत होतं की व्हीव्हीपॅटमध्ये गडबड आहे. आता मतदार याद्यांमध्येच गडबड असल्याचे समोर आले आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

विरळी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी २, ५२, ९७० मतदार होते. ते मतदार विधानसभा निवडणुकीत २, ६३, ३५२ झाले. म्हणजेच १६, ०४३ मतांची वाढ काही महिन्यात झाली. वरळी मतदारसंघात १९, ३३३ मतदारांसंदर्भात गडबड आहे. वरळीत ५०२ मतदार अशी आहेत ज्यांची नावं जवळपास सारखीच आहेत. गिरीश गजानन म्हात्रे या मतदाराच्या वडिलांचे नाव भानजी पटेल असे आहे. गौरी गगन गुप्ता, तेजश्री हडकर या महिला मतदाराचे लिंग पुरुष असल्याचे दाखवले आहे. ६४३ मतदारांचे लिंग चुकीचे दाखवल्याचे सापडले आहे, असे पुरावे साद करत आदित्य ठाकरे यांनी मतदार यादीत गडबड आहे, असा आरोप केला.

 

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!