Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nagpur police : साताऱ्यानंतर नागपूरमध्ये खाकीला डाग; पोलीस कर्मचाऱ्यावर २३ वर्षीय तरुणीचा बलात्काराचा गंभीर आरोप

Nagpur police : साताऱ्यानंतर नागपूरमध्ये खाकीला डाग; पोलीस कर्मचाऱ्यावर २३ वर्षीय तरुणीचा बलात्काराचा गंभीर आरोप

Umesh Shelke Nagpur police : साताऱ्यातील फलटण प्रकरणाने महाराष्ट्र हादरला असताना, आता नागपूरमध्येही खाकीवरील विश्वासघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणीने नागपूर पोलीस दलातील कर्मचारी उमेश शेळके यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाने उपराजधानीतील पोलिस दलात खळबळ उडाली असून, पीडित तरुणीने कारवाईत विलंब झाल्याचा आरोप करत न्यायाची मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, उमेश शेळके हे नागपूर पोलीस दलातील कर्मचारी असून, त्याने लग्नाचे खोटे आमिष दाखवून पीडित तरुणीला विश्वासात घेतले. यानंतर अनेकदा शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे. पीडित २३ वर्षीय तरुणीने तीन आठवड्यांपूर्वी कपिलनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवर आधारित लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा नोंदवून घेतल्यानंतरही आरोपी शेळके विरोधात ठोस कारवाई झालेली नाही, असा दावा पीडित तरुणीने केला आहे.

आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरू

दुसरीकडे, पोलिसांकडून सांगितले जाते की, उमेश शेळके तीन आठवड्यांपासून फरार आहे आणि त्याचा शोध घेतला जात आहे. नागपूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, किती तथ्य आहे याची खात्री करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ही घटना फलटणमधील महिला डॉक्टरवर पोलिस अधिकाऱ्याकडून झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर घडली असल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. फलटण प्रकरणात पीएसआय बदने यांच्यावर बलात्कार व मानसिक त्रास देण्याचे आरोप आहेत, ज्यात पीडित डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी त्यांचे नाव हातावर लिहिले होते.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!