Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी..! एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जबरी चोरी; कपाटं फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

मोठी बातमी..! एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जबरी चोरी; कपाटं फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

Eknath Khadse : जळगावमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी मध्यरात्री चोरट्यांनी धाडसाने चोरी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत तळमजला व पहिल्या मजल्यावरील खोल्यांमधील कपाटं फोडली, सर्व सामान अस्थव्यस्थ केले आणि लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेचे फोटो व व्हिडिओ समोर आले असून, घरातील कपडे, पर्स आणि इतर वस्तू जमिनीवर अस्थव्यस्थ पडले आहेत.

मध्यरात्री नेमकं काय घडलं?

चोरट्यांनी मध्यरात्री घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तळमजला व पहिल्या मजल्यावरील खोल्यांमधील कपाटं उघडून त्यातील मौल्यवान वस्तू व रोख रक्कम चोरून नेली. घरातील नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही, परंतु लाखोंचा ऐवज लंपास झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व फॉरेन्सिक टीमही बोलावण्यात आली आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर चोरी

धक्कादायक बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या सून व खासदार रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगरमधील पेट्रोल पंपावरही चोरीची घटना घडली होती. या सलग घटनांमुळे खडसे कुटुंबीयांसह परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय सूड किंवा सुनियोजित कट असल्याची शक्यता व्यक्त होत असून, पोलिस या दृष्टिकोनातूनही तपास करत आहेत.

खडसे कुटुंबीयांचा संताप

एकनाथ खडसे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत पोलिसांना तात्काळ चोरट्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. “घरात कोणी नसताना चोरट्यांनी धाडसाने चोरी केली. पोलिसांनी लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडावे,” अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!