Today सोमवार, 15th जून 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का बसणार? महत्त्वाच्या बैठकीला ‘या’ ३ आमदारांची दांडी, कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का बसणार? महत्त्वाच्या बैठकीला ‘या’ ३ आमदारांची दांडी, कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

Maharashtra Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटात सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व आमदारांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा होणार होती.

मात्र, या बैठकीला पक्षाच्या सोलापूरमधील ४ पैकी ३ आमदारांनी दांडी मारली. यामुळे पक्षांतर्गत असंतोष व राजकीय भूमिका बदलण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. एकमेव माढ्याचे आमदार अभिजीत पाटील उपस्थित होते, तर करमाळ्याचे नारायण पाटील, माळशिरसचे उत्तम जानकर व मोहोळचे राजू खरे यांनी अनुपस्थिती नोंदवली.

शरद पवारांनी ही बैठक स्थानिक निवडणुकांसाठी एकजूट दाखवण्याच्या उद्देशाने बोलावली होती, मात्र ३ आमदारांच्या दांडीने पक्षाच्या सोलापूरमधील आधाराला धक्का बसला आहे. मागील काही महिन्यांत शरद पवार गटात अशा प्रकारच्या हालचाली वाढल्या असून जानवरी २०२५ मध्ये अजित पवार गटाने दावा केला होता की, शरद पवार गटातील ६ खासदार व अनेक आमदार त्यांच्याकडे येणार आहेत.

डिसेंबर २०२४ मध्येही तीन नेत्यांनी अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, ज्यामुळे पक्षातील फूट वाढत असल्याचे दिसते. सोलापूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील हे आमदार महायुतीकडे वळले तर शरद पवार गटाला स्थानिक निवडणुकांमध्ये मोठा फटका बसू शकतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!