Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PSI गोपाल बदणेचं आणखी एक कांड! सरेंडर करण्याआधीच केला ‘हा’ गुन्हा

PSI गोपाल बदणेचं आणखी एक कांड! सरेंडर करण्याआधीच केला ‘हा’ गुन्हा

Satara Crime: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्या प्रमुख आरोपी पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदणे याने पोलिसांसमोर हजर होण्यापूर्वीच या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा त्याचा मोबाईल फोन लपवला असल्याचे समोर आले आहे. या बाबत विचारले असता तो चौकशीत मौन बाळगत असल्याने तपासात गंभीर अडथळे निर्माण झाले आहेत.

महिला डॉक्टरने आपल्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर यांना थेट जबाबदार धरले होते. नोटमध्ये डॉक्टरने बदणेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आणि बनकरकडून मानसिक तसेच शारीरिक छळ झाल्याचा आरोप केला होता. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

तथापि, चौकशीत उघड झाले की, पीएसआय बदणेने आत्महत्येच्या काही तास आधी आपला मोबाईल फोन लपवला. त्याने हा फोन कुठे ठेवला किंवा कोणाकडे दिला, याची कोणतीही माहिती देण्यास तो नकार देत आहे. पोलिसांच्या मते, या फोनमध्ये डॉक्टरशी झालेले कॉल्स, मेसेजेस आणि व्हॉट्सअॅप चॅट्ससह अनेक महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; हॉटेच्या रूममधलं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

तपासात हेही स्पष्ट झाले की, डॉक्टर आत्महत्या करण्याच्या काही वेळ आधी बदणे आणि प्रशांत बनकर यांच्यात व्हॉट्सअॅप कॉलवरून संवाद झाला होता. त्या संभाषणात नेमकं काय बोललं गेलं, हे उघड झाल्यास प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील, मात्र मोबाईल गायब असल्याने पोलिसांसमोर मोठं कोडं निर्माण झालं आहे. सध्या पोलीस पथके गायब मोबाईलचा शोध युद्धपातळीवर घेत आहेत, तर बदणेचा मौनवास कायम असल्याने चौकशी अधिक गुंतागुंतीची बनली आहे. या पुराव्याशिवाय आत्महत्येमागील खरी कारणं आणि आरोपींच्या सहभागाचा तपशील समोर येणं कठीण असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!