Today मंगळवार, 28th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Water Cut: पुणेकरांनो लक्ष द्या! ‘या’ दिवशी शहरात पाणीपुरवठा बंद राहणार

Pune Water Cut: पुणेकरांनो लक्ष द्या! ‘या’ दिवशी शहरात पाणीपुरवठा बंद राहणार

Pune Water Cut: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ३० ऑक्टोबर (गुरुवार) रोजी पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. पर्वती आणि भामा आसखेड पाईपलाईनवरील आवश्यक दुरुस्ती व देखभाल कामांमुळे पुणे महानगरपालिकेने (PMC) शहरातील अनेक भागांमध्ये संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) कमी दाबाने आणि विलंबाने पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता असल्याचे जलपुरवठा विभागाने सांगितले. लष्कर वॉटर स्टेशनला पर्वती वॉटर वर्क्समधून पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती दुरुस्ती आणि भामा आसखेड प्रकल्प लाईनवरील देखभाल कामे होणार आहेत.

लष्कर जलपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता वीरेंद्र केळकर यांनी सांगितलं की, ‘या दुरुस्ती भविष्यातील गळती रोखण्यासाठी आणि पाण्याचा दाब संतुलित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नागरिकांनी गुरुवारी पाण्याचा वापर नियोजनपूर्वक करावा.’

लष्कर वॉटर वर्क्स अंतर्गत बाधित क्षेत्रे

संपूर्ण रामटेकडी औद्योगिक परिसर, सय्यदनगर, हेवन पार्क, शंकर मठ, वैदू वाडी, राम नगर, आनंद नगर, हडपसर गावठाण, सातव वाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड, बीटी कवडे रोड, मोहम्मदनगर, भीमनगर, पार्कींग रोड, भीमनगर, उजवीकडे कोठेगाव रोड, कोठेगाव रोड, गडगड, गोंधळेनगर, ससाणेनगर. फुरसुंगी, उरुळी देवाची प्रभावित होणार आहे. याशिवाय फुरसुंगी आणि उरुळी देवाचीला टँकरने होणारा पाणीपुरवठाही थांबवण्यात येणार आहे.

हेही वाचा – ATS ची मोठी कारवाई! पुणे स्थानकावर संशयित दहशतवाद्याला अटक

नगर रोड वॉटर वर्क्स अंतर्गत बाधित झालेले क्षेत्र

संपूर्ण खराडी परिसर ज्यामध्ये आपळे घर, भणगाई वस्ती, चौधरी वस्ती, एकनाथ पठारे नगर, सातव वस्ती, थिटे वस्ती, चंदन नगर, बोराटे नगर, यशवंत नगर, तुकाराम नगर, वडगाव शेरी, गणेश नगर, आनंद पार्क, राजश्रीनगर कॉलनी, महावीरनगर, महावीरनगर

भामा आसखेड योजनेत बाधित झालेले क्षेत्र

शेजवळ पार्क, विडी कामगार वस्ती, साईनाथ नगर, वाढेश्वर नगर, मारुती नगर, घरकुल सोसायटी, टेम्पो चौक, पोटे नगर, विद्या नगर, आणि मुरलीधर सोसायटी या भागात दिवसभर शुकशुकाट राहील. दरम्यान, पुणे महानगरपालिकेने नागरिकांना गुरुवारी पाणी साठवून ठेवण्याचे आणि पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!