पुणे : कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. एका रिक्त पदावर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे येथे वरिष्ठ संशोधन फेलो या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वरिष्ठ संशोधन फेलो.
– रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : ०६ फेब्रुवारी २०२६.
– मुलाखतीचा पत्ता : ICAR-कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे महाराष्ट्र – 410505.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.dogr.res.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


