पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड येथे सहाय्यक अभियंता (श्रेणी-१) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत १० रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
सदर मुलाखत ही ३ मे २०२६ रोजी बीईएमएल लिमिटेड, बीएसएनएल भवन, दुसरा मजला, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे – ४११०१६ येथे घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.bemlindia.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


