पुणे : यवतमाळ येथील कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, यवतमाळ येथे सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (पीटीआय), सहाय्यक ग्रंथपाल यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला यवतमाळ येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत ९ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (पीटीआय), सहाय्यक ग्रंथपाल.
– एकूण रिक्त पदे : 09 पदे.
– नोकरीचे ठिकाण : यवतमाळ.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन (हार्ड कॉपी).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ जानेवारी २०२६
– अर्ज सादर / पाठवण्याचा करण्याचा पत्ता : कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, यवतमाळ.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : ०९ फेब्रुवारी २०२६.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.pdkv.ac.in/या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


