Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’ येथे मिळू शकते नोकरी; घरबसल्या करा अर्ज…

‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’ येथे मिळू शकते नोकरी; घरबसल्या करा अर्ज…

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’ येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’ येथे तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार, पदवीधर (अभियांत्रिकी व्यतिरिक्त पदवी) शिकाऊ उमेदवार या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 14 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार, पदवीधर (अभियांत्रिकी व्यतिरिक्त पदवी) शिकाऊ उमेदवार.

– एकूण रिक्त पदे : 14 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.

– वेतन / मानधन : दरमहा 8000 ते 9000 पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी)

– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : ०८ जानेवारी २०२६.

– मुलाखतीचा पत्ता : एसआयआर – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, प्रादेशिक केंद्र, मुंबई, लोखंडवाला रोड, ४ बंगले, अंधेरी पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र ४०००५३.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.nio.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!