पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मुंबईतील संशोधन केंद्रात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी प्रगत केंद्र, मुंबई येथे तंत्रज्ञ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
सदर मुलाखत ही २७ जानेवारी २०२६ रोजी घेतली जाणार आहे. ही मुलाखत तिसरा मजला, पेमास्टर शोधिका, TMC-ACTREC, से-22, खारघर, नवी मुंबई- 410210 येथे होणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.actrec.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : तंत्रज्ञ.
– नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा २५,५१०/- रुपये ते ३५,०००/- रुपये.
– वयोमर्यादा : ३० वर्षांपर्यंत
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : २७ जानेवारी २०२६.
– मुलाखतीचा पत्ता : तिसरा मजला, पेमास्टर शोधिका, TMC-ACTREC, से-22, खारघर, नवी मुंबई- 410210.


