पुणे : पुण्यातील ‘एअर फोर्स स्कूल’ येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 14 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. एअर फोर्स स्कूल, पुणे येथे पदव्युत्तर शिक्षक (संगणक) आणि विशेष शिक्षक यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : पदव्युत्तर शिक्षक (संगणक) आणि विशेष शिक्षक.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वेतन / मानधन : पदव्युत्तर शिक्षक (संगणक): दरमहा ३५,०००/- रुपये एकत्रित वेतन आणि विशेष शिक्षक: दरमहा २८,५००/- रुपये एकत्रित वेतन.
– वयोमर्यादा : २१ वर्षे ते ५० वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जानेवारी 2026.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : recruitmentatafsvn@gmail.com
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.airforceschoolpune.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


