पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीयीकृत बँक अशी ओळख असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे विदेशी चलन अधिकारी (फॉरेन एक्सचेंज ऑफिसर) – स्केल III, विपणन अधिकारी (मार्केटिंग ऑफिसर) – स्केल I या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्रात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 350 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : विदेशी चलन अधिकारी (फॉरेन एक्सचेंज ऑफिसर) – स्केल III, विपणन अधिकारी (मार्केटिंग ऑफिसर) – स्केल I.
– एकूण रिक्त पदे : 350 पदे.
– नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ फेब्रुवारी २०२६.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.centralbankofindia.co.in/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


