पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, कर्मवीर मा. सां. कन्नमवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
कर्मवीर मा.सां. कन्नमवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चंद्रपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत १९ रिक्त पदे भरली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी अधिष्ठाता यांचे कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.gmcchandrapur.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


